‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षान्त समारंभाची तयारी पूर्ण

नांदेड ,२३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सविसाव्या दीक्षान्त समारंभ २५सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती  श्री. रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे. 

शास्त्रज्ञ  बी. सरवणन

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागातील अनुखनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयांचे संचालक तथा उत्कृष्ट शास्त्रज्ञ श्री. बी. सरवणन हे दीक्षान्त समारंभाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यापैकी राज्यपाल व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या दोघांची अभासी उपस्थिती लाभणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी कळविले आहे. 

याप्रसंगी सन्माननीय अतिथींच्या हस्ते ५२ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाचे वाटप होणार आहे. त्यामध्ये विद्यापीठात दरवर्षी सर्वाधिक गुण घेणारा विद्यार्थी किरण हसुळे यांना राज्यपालांचे सुवर्ण पदक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच याच कार्यक्रमध्ये १०२ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत संयुक्ता डोईबळे, अन्सारी मो.साजेद मो. मसूद, ऋतुजा माशलकर, शेख उमेकुलसुम निझामोद्दिन, वैष्णवी तोटरे, अभिषेक नायक,शिवानी कुऱ्हाडे, सय्यद फौजिया मुबीन पटेल, वैभव मोहनालकर, शेख आशिया जाफरसाब, राधिका कराड, सुमया फिरदोस अब्दुल रऊफ, अब्दुल अस्लम फईम, श्वेता पुंड, उदय कुमकर, ज्योती नरवाडे, सचिन कांबळे, शमामा महिन मो. बाबर फारुकी या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात येणार आहे.  

मानव्यविज्ञान विद्याशाखेंतर्गत ऋतुजा शिंदे, सुषमा बेलकुंडे, कैलास घाडे,मुकुल कचरे, कलावती लाटे, आकांक्षा अडपोड, सायली घाडगे, शुभम निकम, सय्यद मिनाज हबीब,सुप्रिया थोरात, रागिणी हार्के, गंगोत्री जोशी, मयुरी शिंदे, वृषाली सुन्नेवार, गजानन मुधोळकर यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात येणार आहे. 

वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेंतर्गत साक्षी झामरे, तन्मय जाधव,ऐश्वर्या कसबे, नेहा सहानी या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहेत.  आंतरविद्याशाखेंतर्गत मिलिंद वाघमारे, आकांक्षा पिंगळे या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहेत.  अशा प्रकारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षान्त समारंभाची तयारी पूर्ण झालेली आहे.