नांदेड जिल्ह्यात 216 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

225 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 29 :- मंगळवार 29 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 225 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 216 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 148 बाधित आले.

आजच्या एकुण 986 अहवालापैकी 740 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 15 हजार 442 एवढी झाली असून यातील 11 हजार 715 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 242 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 32 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवार 27 सप्टेंबर रोजी कल्याणनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, जुना मोंढा नांदेड येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा यांच्या खाजगी रुग्णालयात तर सोमवार 28 सप्टेंबर रोजी सिडको नांदेड येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा तर मंगळवार 29 सप्टेंबर रोजी नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील 67 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 398 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 82 हजार 18,एकुण निगेटिव्ह स्वॅब- 62 हजार 327,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 15 हजार 442,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 11 हजार 715,एकूण मृत्यू संख्या- 398,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 78.32 टक्के.आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-07आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 8,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 844, आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 242,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 32.