परभणी जिल्ह्यात 617 रुग्णांवर उपचार सुरू, 56 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 29 :- जिल्ह्यातील 56 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 234 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 हजार 395 बरे झाले तर 222 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 617 जणांवर उपचार सुरु आहेत. सोमवार दि.27 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 82 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 723 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 617 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 106 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.