जैवतंत्रज्ञान विभागाने चार कोविड-19 जैव-बँकांची केली सुरुवात

कोविड-19 महामारीचा प्रकोप शमविण्यासाठी लस, निदान व उपचार या तीनही पातळ्यांवर संशोधन आणि प्रगतीच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. कोविड-19 बाधितांचे नमुने हे संशोधनासाठी मोलाचे आहेत. कोविड-19 बाधितांकडून मिळालेले जैव नमुने आणि माहिती ही संशोधनात्मक कामासाठी पुरविण्याबाबत दिशादर्शक नियमावली, निती आयोगाने नुकतीच जाहीर केली. कॅबिनेट सचिवांच्या सुचनेप्रमाणे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोविड-19 बाधितांचे वैद्यकिय परिक्षण नमुने (घसा तसेच नासिका स्राव नमुने/फुफ्फुसातील स्राव/थुंकी, रक्त, लघवी व मल) जमा करणे, साठवणे व देखरेख करणे, यासाठी 16 जैवकोश/’बायोरिपॉझिटरी’ना परवानगी दिली आहे.

हे 16 जैवकोश पुढीलप्रमाणे ICMR– 9, DBT– 4 आणि CSIR– 3. जैवतंत्रज्ञान विभागाच्या अधिकारकक्षेत चार जैवकोश उपलब्ध आहेत. ते पुढीलप्रमाणे NCR-जैवतंत्रज्ञान विज्ञान समूह, (i) THSTI, फरिदाबाद – वैद्यकीय परिक्षण नमुने, (ii) RCB फरिदाबाद – विषाणू नमूने, जीवविज्ञान संस्था, भुवनेश्वर, INStem बेंगळुरू आणि IlBS, नवी दिल्ली घशातील तसेच नासिकामार्गातील स्रावाचे नमुने, फुफ्फुसातील स्रावाचे नमुने, थुंकी, रक्त, मुत्र व मल यांचे नमुने जमा तसेच जतन करण्यासाठी, जेणेकरून हे नमुने पुढील योग्य निदान, उपचार आणि लस यांच्या संशोधनासाठी वापरता येतील. नमुने जमवणे, एका ठिकाणहून दुसरीकडे नेणे, परिक्षणयोग्य भाग वेगळा काढणे, जतन करणे तसेच विभागणे, यासाठी वर उल्लेख केलेल्या सुविधा एकसमान मानक प्रक्रिया आकाराला आणतील. कोविड-19 वर लस, उपचार आणि हाताळण्यासंबधी घेण्याची काळजी, यासाठी अगदी नासिका द्राव नमुने ते कोरोनो विषाणू नमुन्यांवर काम करताना BSL-3 नियमावली पाळणे, यासाठी या जैवकोशांची भूमिका महत्वाची असेल. या कोविड-19 साठी असलेल्या जैवकोश सुविधांना जैवतंत्रज्ञान विभागाचे सुनियोजित भविष्यकालीन योजनेद्वारे सहाय्य मिळेल. त्यामुळे नवनवीन तांत्रिक शोध पुढे येण्यास मदत होईल. या वर उल्लेख केलेल्या जैवकोशातील वैद्यकीय परिक्षण नमुने संबधित संस्थांना संशोधन आणि विकास कामासाठी उपयोगी पडतील.

त्याशिवाय निदान, उपचार आणि लस यासंबधीत शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यावसायिक उपयोजनासाठी उपलब्ध करून देण्याचे आधिकारही त्यांना देण्यात आले आहेत. अर्थात त्यासाठी केलेल्या विनंतीमागील हेतूंची पूर्णपणे छाननी करून आणि त्याचा देशाला उपयोग होईल याची खातरजमा केल्यावरच ते उपलब्ध करता येतील. वैद्यकीय परिक्षण आणि विषाणू नमूने वापरासाठी उपलब्ध करून देणे, हे नवे तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी शास्त्रज्ञांना, नवउद्योजकांना तसेच उद्योग क्षेत्राला उपयोगी पडतील. आत्मनिर्भर भारत उभारणीच्या प्रवासातील हे एक महत्वाचे पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *