नांदेड जिल्ह्यात 154 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

263 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 28 :-सोमवार 28 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 263 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 154 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 74 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 80 बाधित आले.

आजच्या एकुण 670 अहवालापैकी 494 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 15 हजार 226 एवढी झाली असून यातील 11 हजार 490 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 274 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 50 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवार 27 सप्टेंबर रोजी पोर्णिमानगर नांदेड येथील 54 वर्षाच्या एका महिलेचा, कंधार येथील 90 वर्षाच्या एका पुरुषाचा, नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर सोमवार 28 सप्टेंबर रोजी उमरी येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 394 झाली आहे.

आज बरे झालेल्या 263 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 74 तर अँटिजेन तपासणीद्वारे एकूण 80 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 274 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 81 हजार 174,एकुण निगेटिव्ह स्वॅब- 61 हजार 719,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 15 हजार 226,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 11 हजार 490,एकूण मृत्यू संख्या- 394,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 77.83 टक्के.आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 846, आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 274,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 50.