परभणी जिल्ह्यात 644 रुग्णांवर उपचार सुरू, 35 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 28 :- जिल्ह्यातील 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 178 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 हजार 313 बरे झाले तर 221 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 644 जणांवर उपचार सुरु आहेत.

रविवार दि.27 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 40 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 723 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 644 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 79 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.