मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज बंद 

छत्रपती संभाजीनगर,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हात बंद पुकारण्यात आला आहे. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याला विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकारी, आदींनी पाठिंबा दिला आहे. तसेच लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवला आहे.

हे सुरू राहणार

हॉस्पीटल्स, रुग्णवाहिका, महत्त्वाच्या कामासाठी जाणारी प्रवासी वाहने, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना, रूग्णांना घेऊन जाणाऱ्या ऑटोरिक्षा, सकाळच्या सत्रात दुध,भाजीपाल्याची बाजारपेठ व वाहने सुरु राहातील. औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्या ज्यांना बंद ठेवता येत नाहीत, महत्त्वाचे उत्पादने निर्मिती करतात, त्यांनाच.

हे बंद राहणार

बससेवा, स्मार्ट सिटी बस, दुपारनंतर कृषी उत्पन्न बाजारपेठ, जुन्या मोंढ्यातील काही व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत. सर्व दुकाने, स्वयंस्फूर्तीने शाळा, महाविद्यालये, मॉल आदी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजेपर्यंत जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीचा बाजार सुरु राहणार आहे. त्यानंतर बाजारपेठ पूर्णपणे बंद होईल, अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली.