माजी केंद्रीय मंत्री मेजर जसवंत सिंह (निवृत्त) यांचे निधन

नवी दिल्ली,  27 सप्टेंबर  2020

लष्कराच्या नवी दिल्ली येथील  रुग्णालयाला (संशोधन आणि संदर्भ)  कळविण्यास अत्यंत  दु:ख होत आहे, की भारत सरकारातील माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री  मेजर जसवंत सिंह (निवृत्त) यांचे आज दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 6:55 वाजता निधन झाले. त्यांना दिनांक 25 जून 2020 रोजी सैन्यदलाच्या रुग्णालयात विविध अवयवांचे कार्य थांबणे (Multiorgan Dysfunction Syndrome मल्टी ऑर्गन डिसफंक्शन) ) आणि  मस्तकाला जोराने  झालेल्या जुन्या अपघाताच्या (Severe Head Injury ) उपचारासाठी  भरती करण्यात आले असताना त्यांना आज हृदयविकाराचा झटका आला.

उपस्थित अनेक तज्ञ डाँक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी  खूप प्रयत्न केले परंतु त्याला त्यांनी दाद दिली नाही आणि आज दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी  सकाळी 6:55 वाजता त्यांचे निधन झाले.त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती.

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले,” जसवंत सिंहजींनी प्रथम सैनिक म्हणून आणि त्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशाची तत्परतेने सेवा केली. अटलजींच्या सरकारात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली आणि अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार अशा क्षेत्रांत आपला ठसा उमटवला.मला त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे.”

पंतप्रधान पुढे म्हणाले, “राजकीय आणि सामाजिक अशा विविध विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनासाठी जसवंतजी आपल्या स्मरणात राहतील. मला आमच्या चर्चांची नेहमीच आठवण येईल. त्यांच्या कुटुंबियांचे  आणि समर्थंकांचे मी सांत्वन करतो.ओम शांती.”पंतप्रधानांनी मानवेंद्र सिंग यांच्याशीसुद्धा बोलून जसवंत सिंहजी यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

जसवंत सिंह जागतिक दर्जाचे मुत्सद्दी व राजनीतिज्ञ – राज्यपाल

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

जसवंत सिंह यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. प्रखर देशभक्त, अभ्यासू व प्रभावी वक्ते असलेल्या जसवंत सिंह यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण, अर्थ व परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांची संसदेतील व संसदेबाहेरील अभ्यासपूर्ण भाषणे व वक्तव्ये आवर्जून ऐकली जात. श्री. जसवंत सिंह यांचेशी माझा घनिष्ठ परिचय होता हे माझे भाग्य होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक जागतिक दर्जाचा मुत्सद्दी व राजनीतिज्ञ गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो अशी प्रार्थना करतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांचे चिरंजीव मानवेंद्र सिंह व इतर परिवारजनांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *