डीएसटीने कोविड -19 ‘इंडिया नॅशनल सुपर मॉडेल’ काम हाती घेतले

नवी दिल्ली, 30 मे 2020

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) भविष्यात होणाऱ्या संसर्गावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेची तयारी आणि इतर उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून कोविड -19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेल काम सुरु केले.

सरकार संसर्ग क्षमता आणि जीवितहानीवर बारीक लक्ष ठेवून आहे, परंतु रोगावरील देखरेख वाढवण्यासाठी तसेच प्रसाराचा अंदाज वर्तवण्यासाठी एक मजबूत पूर्वसूचना प्रणाली आणणे अत्यावश्यक आहे. कोविड -19 संबंधी अंदाज आणि देखरेखीसाठी  असंख्य गणितीय मॉडेलची डीएसटी-एसईआरबी (विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ) आणि अन्य संस्थांद्वारे प्रायोजित विश्लेषकांकडून चाचपणी केली जात आहे.

हवामानविषयक घटनांच्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी गणितीय मॉडेल्सचा वापर करण्याचा भारताचा जो इतिहास आहे, त्याने प्रेरित झालेल्या डीएसटीने या क्षेत्रातील तज्ज्ञांचा शोध घेण्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे, जो  पुरावा-आधारित अंदाजासाठी आवश्यक कठीण चाचण्या काळजीपूर्वक घेईल आणि हवामानाचा अंदाज घेणाऱ्या समुदायांमध्ये ज्याचा नियमितपणे वापर  करता येतील.

मॉडेल संपूर्णपणे केवळ कोविड -19 संबंधित माहितीवर अवलंबून असेल आणि माहितीतील नवीन कल जाणून घेऊन त्यातून शिकण्यासाठी ‘बिल्ट-इन’ घटक देखील असेल. हे  यशस्वी पुरावा-आधारित गणितीय व सांख्यिकीय अंदाज मॉडेल एकत्रित करेल तसेच संसर्गजन्य रोगाच्या प्रसाराच्या अंदाजासाठी सर्वोत्तम पूर्वसूचित विश्लेषणाचा यात समावेश असेल. या सुपरमॉडेलचा वापर भारत तसेच जगभरातील धोरणकर्त्यांद्वारे संसर्ग प्रसाराच्या दराबाबत अंदाज वर्तवण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो;  त्यामुळे साथीच्या आजाराला आळा घालता येईल. 

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र (जेएनसीएएसआर) आणि आयआयएससी, बेंगळुरू हे देशातील सर्व कोविड -19 मॉडेलिंग प्रकल्प व कार्यक्रमांशी जोडण्यासाठी तसेच एकत्रित कार्य करण्यासाठी समन्वय साधेल. हे विविध मॉडेल्सचे मूल्यांकन करण्यासाठी आणि शेवटी कोविड -19 ‘इंडिया नॅशनल सुपर मॉडेल’ सादर करण्यासाठी मापदंडांचा एक संच विकसित करण्यात मदत करेल. समन्वय गट  वापरण्यास योग्य ‘इंटरफेस’ आणि ‘सॉफ्टवेअर’ सुनिश्चित करण्यासाठी मॉडेलिंग, विविध सॉफ्टवेअर विकसक तसेच नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत संशोधक गटांशी सल्लामसलत करुन काम करेल.

एक सल्लागार समिती डीएसटी, एसईआरबी आणि समन्वयक (जेएनसीएएसआर आणि आयआयएससी बेंगळुरू ) आणि या उपक्रमातील मॉडेलर्सबरोबर काम करून तांत्रिक एकत्रिकरण, मार्गदर्शन आणि एक मजबूत सुपरमॉडेल तयार करण्याबाबत महत्वपूर्ण माहिती पुरवेल.

यासंदर्भात डीएसटीचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा म्हणाले की, “कोविड -19  विषाणूच्या प्रसारासाठी गणितीय मॉडेलिंग, सिम्युलेशन आणि त्याचा प्रभाव केवळ शैक्षणिक अभ्यास नाही तर तर्कसंगत निर्णय घेण्याची, नियोजन आणि संसाधन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली गरज आहे. या क्षेत्रात कार्यरत  वैज्ञानिक समुदायाकडून मूल्यमापन आणि चाचणी केलेले एक सशक्त नॅशनल मॉडेल विकसित करणे अतिशय महत्वाचे आहे. “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *