नांदेड जिल्ह्यात 222 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

255 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 26 :- शनिवार 26 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 255 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 222 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 81 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 141 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 19 अहवालापैकी 752 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 14 हजार 890 एवढी झाली असून यातील 10 हजार 952 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 481 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 44 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मंगळवार 22 सप्टेंबर रोजी तरोडा नाका नांदेड येथील 63 वर्षाच्या एका पुरुषाचा तर शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी उमरी येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, हडको नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, विष्णुपुरी नांदेड येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील रुग्णालयात, धनेगाव नांदेड येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 386 झाली आहे.

आज बरे झालेल्या 255 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 81 तर अँटिजेन तपासणीद्वारे एकूण 141 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 481 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 79 हजार 487,निगेटिव्ह स्वॅब- 60 हजार 687,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 14 हजार 890,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 12,एकूण मृत्यू संख्या- 386, एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 10 हजार 952,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 481,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 561, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 44,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 76 टक्के.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *