परभणी जिल्ह्यात 685 रुग्णांवर उपचार सुरू, 111 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 25 :- जिल्ह्यातील 111 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4991 एवढी झाली आहे. त्यापैकी 4096 बरे झाले तर 210 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 685 जणांवर उपचार सुरु आहेत.गुरुवार दि.24 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 116 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 765 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 685 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 80 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *