औरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

जिल्ह्यात 25054 कोरोनामुक्त, 6142 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 24 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 362 जणांना (मनपा 216, ग्रामीण 146) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 25054 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32089 झाली आहे. आजपर्यंत एकूण 893 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 95 आणि ग्रामीण भागात 52 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (125) देवपुरा, कन्नड (1), वाळूज (4), तीसगाव, वळदगाव (1), साजापूर (1), बजाज नगर (2), देवगिरी नगर, बजाज नगर (1), गजानन नगर, बजाज नगर (1), महादेव मंदिर परिसर, एफडीसी कॉलनी (1), चिंचखेडा कन्नड (1), औराळा, कन्नड (1), फर्दापूर (1), माळीवाडा (1), बकवाल नगर, नायगाव (2), रांजणगाव, निलजगाव (5), पिंप्री राजा (1), जय भवानी नगर, पैठण (1), वाहेगाव (1), राम नगर, पैठण (1), भालगाव, गंगापूर (1), नूतन कॉलनी, गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी (2), शिलेगाव (1), अकोली वडगाव (1), धानोरा, गंगापूर (1), शिवाजी नगर, सिल्लोड (1), शाहू नगर, सिल्लोड (1), भवन (6), चांदापूर सिल्लोड (1), टिळक नगर सिल्लोड (1), वीरगाव, वैजापूर (1), भाटिया गल्ली वैजापूर (1), चंद्रपाल नगर, वैजापूर (1), रेणुका नगर, वैजापूर (1), गुरूदत्त कॉलनी, वैजापूर (1), पाटील गल्ली, गंगापूर (1), आडगाव कन्नड (1), करंजखेडा (2), सिद्धेश्वर विहार, कमलापूर (3), शेळके हॉस्पीटल, वाळूज (1), हनुमान नगर, कमलापूर (1), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (1), औरंगाबाद (9), गंगापूर (13), कन्नड (14), खुलताबाद (2), सिल्लोड (1), वैजापूर (12), पैठण (6), घाणेगाव (1), कमलापूर (1), रांजणगाव (1), वडगाव को. (1), अन्य (1), जेऊर (1), फत्तेपूर (3)

मनपा (97) नंदनवन कॉलनी (3), फाजिलपुरा (1), हनुमान नगर (2), बन्सीलाल नगर (1), मालन नगर (1), एन दोन सिडको (1), एन तीन सिडको (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), पुंडलिक नगर (1), साई नगरी, शहानूरवाडी (2), औरंगपुरा (1), इटखेडा (2), वेदांत नगर (1), कोकणवाडी (1), वृंदावन कालनी (1), जालन नगर (2), गुलमोहर कॉलनी (1), संभाजी कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (1), शिवनेरी कॉलनी (1), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (1), एन अकरा हडको (2), सरस्वती कॉलनी (1), समाधान कॉलनी (2), शिवशक्ती कॉलनी (6), मेहेर नगर (1), उल्कानगरी (1), हरिसाल पार्क (1), सुधाकर नगर (1), एन सात सिडको (1), जय भवानी नगर (1), समर्थ नगर (1), भावसिंगपुरा (2), नाईक नगर (1), टिळक नगर (1), बिल्डर सो., नंदनवन कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (2), वसंत नगर (1), नवाबपुरा (1), एकता नगर (1), जटवाडा रोड (1), एन बारा, भारतमाता नगर (1), एन अकरा गजानन नगर (1), पद्मपुरा (2), जलाल नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (3), सिडको (1), हडको (1), चिनार गार्डन (1), राम नगर (3) गोल्डन पार्क इमारत (2), बीड बायपास (1), वाणी मंगल कार्यालय परिसर (1), मयूर पार्क (1), घाटी परिसर (1), देवानगरी (1),एन सहा सिडको (1), गारखेडा परिसर (1), बालाजी नगर (1), पुंडलिक नगर (1), देवळाई परिसर (2), सूतगिरणी चौक (1), स्वास्थ्य हॉस्पीटल (1), मुकुंदवाडी (1), छावणी परिसर (1), शहानूरवाडी (1), गारखेडा परिसर (1), अन्य (1) स्वामी विवेकानंद नगर (1), श्रीहरी सिडको (1), नवजीवन कॉलनी, हडको (2), मूर्तिजापूर (1),सारा सिद्धी बीड बायपास (1) पडेगाव, मिरा नगर (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत खुलताबाद येथील 55 वर्षीय स्त्री, नवयुग कॉलनीतील 78 वर्षीय पुरूष आणि पैठणमधील 63 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *