जालना जिल्ह्यात 142 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

67 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.24 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 67 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 118 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 24 व्यक्तींचा अशा एकुण 142 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13986 असुन सध्या रुग्णालयात-203 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4901, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-315 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-49487 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-142 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7759 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-41098, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-511, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4273

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-51, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4291 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-66, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-352, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-46, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-203,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-96, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 67, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6102, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1456 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-90178, मृतांची संख्या -201हिवरा ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील 76 वर्षीय पुरुष, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील 65 वर्षीय पुरुष, साष्ट पिंपळगाव ता.अंबड येथील 65 वर्षीय पुरुष,जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स परिसरातील 54 वर्षीय पुरुष, घनसावंगी शहरातील 30 वर्षीय पुरुष अशा एकुण पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 31 नागरिकांकडून 4 हजार 875 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 5 हजार 413 नागरीकांकडुन 11 लाख 31 हजार 924 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *