बॉलीवूड ड्रग्स प्रकरण; अभिनेत्री दीपिका, श्रद्धा आणि साराला एनसीबीचे समन्स!

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आता बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन अधोरेखित झाले आहे. हे जाले मोठ्यामोठ्या कलाकारांना अडचणीत आणणार असल्याचे चित्र दिसत आहे. आधी अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या मॅनेजरला अमलीपदार्थ विरोधी पथकाने समन्स बजावला होता. त्यानंतर आता या प्रकरणी अभिनेत्री रकुलप्रीत, सीमोण खांबाटा, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर व श्रुती मोदी यांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 
 
अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये सिनेइंडस्ट्रीमधली ड्रग्सची काळी बाजू समोर आली. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावे समोर आली होती. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचेही नाव समोर आले आहे. करिश्मासोबतच क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांनासुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. रकुलप्रीत, सीमोण खांबाटा, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि श्रुती मोदी यांना येत्या ३ दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश एनसीबीकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे यांच्या चौकशीत आणखी काय समोर येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *