जालना जिल्ह्यात 62 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

88 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना दि.23 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 88 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 30 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 32 व्यक्तींचा अशा एकुण 62 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13902 असुन सध्या रुग्णालयात-192 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4855, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-253 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-48894 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-62 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7617 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-40587, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-571, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4263

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-45, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4240 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-82,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-401 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-35, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -192,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-54, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 88, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6035, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1386 (27 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-89172, मृतांची संख्या -196.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 33 नागरिकांकडून 5 हजार 25 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 5 हजार 382 नागरीकांकडुन 11 लाख 27 हजार 49 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *