नांदेड जिल्ह्यात 245 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड दि. 23 :- बुधवार 23 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 205 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 245 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 66 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 179 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 23 अहवालांपैकी 742 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 14 हजार 200 एवढी झाली असून यातील 10 हजार 183 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 577 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 48 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण 5 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मंगळवार 22 सप्टेंबर 2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील टाऊन मार्केट सोसायटी नांदेड येथील 78 वर्षाच्या एक महिलेचा, बिलोली येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा, सहयोगनगर नांदेड येथील 78 वर्षाच्या एका पुरुषाचा, कंधार तालुक्यातील कुरुळा येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा तर नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे बाफनारोड नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 371 झाली आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 21, बिलोली कोविड केंअर सेंटर 11, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 6, मुखेड कोविड केंअर सेंटर 17, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केंअर सेंटर 2, खाजगी रुग्णालय 17, बारड कोविड केअर सेंटर 7, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 11, मुदखेड कोविड केंअर सेंटर 1, कंधार कोविड केंअर सेंटर 6, नायगाव कोविड केंअर सेंटर 34, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन, होम आयसोलेशन 54, हदगाव कोविड केंअर सेंटर 18 असे 205 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 66 तर अँटिजेन तपासणीद्वारे 179 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 577 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 74 हजार 446,निगेटिव्ह स्वॅब- 57 हजार 209,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 245,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 14 हजार 200,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,एकूण मृत्यू संख्या- 371,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 10 हजार 183,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 577,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 912, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 48,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 74 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *