नांदेड जिल्ह्यात 232 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

317 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 22 :- मंगळवार 22 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 317 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 232 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 84 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 148 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 44 अहवालांपैकी 790 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 13 हजार 955 एवढी झाली असून यातील 9 हजार 978 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 542 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 51 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण 5 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोमवार 21 सप्टेंबर 2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, जुना कौठा येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा, हदगाव तालुक्यातील निवघा येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा. नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे भोकर तालुक्यातील बेंद्री येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा, माहूर कोविड केअर सेंटर येथील माहूर तालुक्यातील पलाईगुडा येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 366 झाली आहे.

आज बरे झालेल्या 317 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 84 तर अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 148 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 542 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 73 हजार 729,निगेटिव्ह स्वॅब- 56 हजार 496,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 232,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 13 हजार 955,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,एकूण मृत्यू संख्या- 366,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 9 हजार 978,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 542,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 169, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 51,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 73.25 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *