मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना श्रद्धांजली

Amazon.in: Buy Marathi Sant Sahityavar Bouddha Dharmacha Prabhav Book  Online at Low Prices in India | Marathi Sant Sahityavar Bouddha Dharmacha  Prabhav Reviews & Ratings
उत्तम भाष्यकार, चळवळींच्या क्षेत्रातील गाढा अभ्यासक गमावला

मुंबई दि. 22 :-  महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा  गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांना वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ. लोखंडे यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध वाड़:मय यांच्या संशोधन-लेखनातून अभ्यासक म्हणून मोठे योगदान दिले आहे.विदर्भ साहित्य संघासह अनेक संस्था, संघटनांच्या माध्यमातून ते साहित्य-संस्कृती क्षेत्रात सक्रिय होते.

आंबेडकरी , दलित आणि बौद्ध विचार चळवळींचे भाष्यकार म्हणून त्यांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यासू मांडणी केली आहे.

डॉ. लोखंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना विनम्र श्रद्धांजली.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

बौद्ध धर्माचे अभ्यासक, नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे सरांच्या निधनाने सामाजिक न्यायाच्या चळवळीचा मार्गदर्शक, व्यासंगी अभ्यासक हरपला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. लोखंडे यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे हे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक, अनुयायी होते. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून त्यांनी सामाजिक न्यायाच्या चळवळीला दिशा देण्याचे काम केले. पाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास होता. सामाजिक चळवळींचे अभ्यासक, भाष्यकार म्हणून ते परिचित होते. साहित्यिक म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे मोठे नुकसान झाले असून थोर विचारवंताला आपण मुकलो आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *