भाजपसोबत जायचे  चार वेळा ठरले , प्रत्येकवेळी काय झाले? अजित पवारांनी बॉम्ब फोडले!

मी खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवाराची औलाद…अजित पवार कडाडले!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. भाजपसोबत जायचा प्रयत्न एकदा नाही तर चार वेळा झाला होता, असं अजित पवार म्हणाले. हे सांगताना अजित पवारांनी प्रत्येकवेळी काय झालं याचा घटनाक्रमच सांगितला आहे.राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीचा आज दुसरा अंक सर्वांसमोर सुरु आहे. इतके दिवस शरद पवारांबाबत नरमाईची भूमिका घेणारे अजित पवार  आज कडाडले. विरुद्ध अजित पवार असा संघर्ष आज पाहायला मिळाला. मी खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवाराची औलाद सांगणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात एल्गार केला.

image.png

‘२०१४ मध्ये  शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी १६ जागा लढवायचा फॉर्म्युला ठरत होता. नितीन गडकरींचीही इच्छा होती, पण काही आरोप होतो म्हणून हे पुढे काही झाले नाही. २०१४ ला फडणवीस मुख्यमंत्री झाले, आम्ही सिल्व्हर ओकला बसलो होतो, प्रफुल पटेल आणि साहेबांचं बोलणं झालं. भाजपला बाहेरून पाठिंबा देतो, असं सांगितलं. नेत्यांचा निर्णय आम्ही गप्प बसलो. मग आम्हाला वानखेडेला शपथविधीला जायला सांगितलं. त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं, तर आम्हाला शपथविधीला का जायला सांगितले?’ असा सवाल अजित पवारांनी विचारला.image.png

२०१७ मध्ये  सुनिल तटकरे, जयंत पाटील मी आणि बाकीचे नेते यांच्यात आणि फडणवीस, मुनगंटीवरा, तावडे आणि चंद्रकांतदादा यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाली. खाती, पालकमंत्री सगळं ठरलं. यानंतर निरोप आला आणि तटकरेंना दिल्लीला बोलावलं. त्यांच्या वरिष्ठांबरोबर आमच्या वरिष्ठांची बैठक झाली. २५ वर्ष आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला आम्ही सोडणार नाही, असं भाजपने सांगितलं. तेव्हा आमचे वरिष्ठ म्हणाले आम्हाला शिवसेना चालत नाही, असा दावा अजित पवारांनी केला आहे.

२०१९ ला काय झालं?

२०१९ ला निकाल लागले, परिस्थिती काय होती माहिती आहे. मोठ्या उद्योगपतीच्या घरी, आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, उद्योगपती, भाजपचे वरिष्ठ नेते मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सगळी चर्चा झाली. पाच बैठका त्या बंगल्यात झाल्या, मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही, नेत्यांनी सांगितलं म्हणून मी बोललो नाही. हे सगळं सुरू असताना अचानक बदल झाला आणि शिवसेनेसोबत जायचं सांगतिलं. २०१७ ला शिवसेना जातियवादी आणि दोन वर्षांनी ते मित्रपक्ष झाला आणि भाजपसोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला, असं चालत नाही, असं म्हणत अजित पवारांनी २०१९ च्या शपथविधीबद्दल गौप्यस्फोट केला.