अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज

मुंबई दि. २१ : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्यावतीने आज दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती आणत महाराष्ट्रातील मराठा समाजाला मोठा धक्का बसला. यानंतर महाराष्ट्रभरातून ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार न्यायालयात अपयशी ठरले, अशी टीका विरोधी पक्षाकडून करण्यात आली. अखेर मराठा आरक्षण स्थगितीविरोधात ठाकरे सरकारने अखेर पहिले पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणवरील स्थगितीनंतर आता राज्य सरकारने यासाठी न्यायालयाला विनंती अर्ज दिला आहे.
 
 
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारवर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. मात्र, ‘आम्हाला मराठा बांधवांना आरक्षण द्यायचे आहे. त्यांच्या न्याय हक्कांसाठी योग्य काय असेल ते करु,’ असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच शनिवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठकही पार पडली. त्यानंतर विरोधी पक्षासोबतही याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर, सोमवारी सरकारतर्फे अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *