स्टार्टअप्स नोकर्‍यांमध्ये 126 टक्क्यांची वाढ

 startups job incresed

नवी दिल्ली, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2016 मध्ये उद्योग आणि अंतर्गत प्रोत्साहन मंडळाची (डीपीआयआयटी) मान्यता असलेल्या स्टार्टअप्स या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. या योजनेला मोठे यश प्राप्त झाले असून, याअंतर्गत नोकर्‍यांमध्ये तब्बल 126 टक्के वाढ झाल्याचे सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

2019च्या जून महिन्यापर्यंत 16,105 स्टार्टअप्सच्या माध्यमातून 1,87,004 रोजगारांची निर्मिती झाली, असे ट्विट डीपीआयआयटीचे सचिव रमेश अभिषेक यांनी केले. 6 सप्टेंबर 2020 पर्यंत 34,267 स्टार्टअप्सच्या माध्यमातून 4,22,986 जणांना रोजगार मिळाला, अशी माहिती वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी मागील आठवड्याच्या सुरुवातीला राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
 
 
जानेवारी 2016 मध्ये स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्यात आला. गोयल यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे, या निधीतून 1322.05 कोटी रुपये 9 सप्टेंबर 2020 रोजी सिडबीला देण्यात आले. त्यापैकी 500 कोटी रुपये हे 2015-16 या आर्थिक वर्षासाठी, 2016-17 साठी 100 कोटी रुपये, 2019-20 साठी 431.3044 कोटी आणि 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 1054.97 कोटी रुपये देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *