जालना जिल्ह्यात 126 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,दोन मृत्यु

105 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना दि.19 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 105 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्दाजरे 82 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 44 व्यक्तींचा अशा एकुण 126 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण रुग्ण-13630 असुन सध्या रुग्णालयात-199 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4725, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-352 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-47012 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-126 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7288 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-39119, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-486, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4191

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-53, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4098 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-148, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-518, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-50, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-199,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-55, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-105, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5608, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1493 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-85508, मृतांची संख्या -187.

जिल्हा सामान्य रुग्णालयात अकोला ता. बदनापुर येथील 60 वर्षीय पुरुष, बाजी उम्रद ता. जालना 65 वर्षीय पुरुष अशा एकुण दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 63 नागरिकांकडून 9 हजार 400 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 5 हजार 259 नागरीकांकडुन 11 लाख 8 हजार 74 रुपये एवढा दंड वसुल करण्या्त आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *