औरंगाबाद जिल्ह्यात 313 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,तेरा मृत्यू

जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 18 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 280 जणांना (मनपा 182, ग्रामीण 98) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 23277 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 313 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30168 झाली आहे. आजपर्यंत एकूण 851 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6040 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पाइँटवर 63, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 91 आणि ग्रामीण भागात 92 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या) आहे.

ग्रामीण (92)

रांजणगाव शेणपूंजी(1), नवापूर (1),  रामरायवाडी, वाळूज (1), बजाजनगर (1), खतखेडा (1), जैनपुरा, पैठण (1), एसबीआय,पैठण (2), म्हाडा कॉलनी, पैठण (1), नारळा, पैठण (1), स्टेशन रोड वैजापूर (1),गंगापूर रोड, वैजापूर  (1), विनायक कॉलनी, वैजापूर  (2), इंदिरानगर  (4), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), औरंगाबाद  (32),  फुलंब्री (7) गंगापूर (6), कन्नड (2), खुलताबाद (1), वैजापूर (18), पैठण (5), सोयगाव (2)

मनपा (67)

दादा कॉलनी (1), देवळाई तांडा (1), घाटी परिसर (1), गारखेडा परिसर (5), साई मेडिसिटी हॉस्पिटल जवळ(2), माऊली नगर (2), जाधववाडी वसंत नगर (2), एकता नगर, तक्षशील नगर (2), देवळाई परिसर (1), साईनाथ नगर (1), हायकोर्ट कॉलनी (1), संग्राम नगर सातारा परिसर (1), हर्सूल, सांवगी (2), हिरापूर (1),एन पाच गुलमोहर कॉलनी (2), म्हाडा कॉलनी (1), एन सात (1), पुंडलिक नगर (1), एमआयडिसी कॉलनी (1), सुराणानगर (1), जय नगर, (1), हमालवाडा (2), गजानन नगर(3), पदमपूरा(2), मुकुंदवाडी(2) एन आठ सिडको (2), राजगुरु नगर (2), मकरंद नगर(1), नंदनवन कॉलनी (1) एन दोन सिडको (1), भानुदास नगर(1), स्वामी विवेकानंद नगर (1), शिवाजी नगर (3), श्रीकृष्ण नगर (1), एन पाच सिडको (1), गुरु प्रसाद नगर बीड बाय पास, (1), जयभवानी नगर(1), गजानन कॉलनी (1),रवी नगर(1), नंदीग्राम कॉलनी(1) कासलीवाल पूर्वा,चिलकठाणा, (1), नारेगाव (1), विष्णूनगर (2),बसय्यै नगर(1), एन सात सिडका(1) मयून पार्क(1), एन सहा सिडको(1)

सिटी एंट्री पॉइंट (63)

आकाशवाणी (01), कुंभेफळ (01), टीव्ही सेंटर(01), सिडको(01), चिकलठाणा(05),  एन दोन (03), बालानगर , पैठण(04), बजाजनगर (03), वाळूज (01), हनुमान नगर (01), मथूरा नगर एन सहा (03), एन अकरा(03), हर्सूल सांवगी (02), सिध्दार्थ नगर (01)

सत्यम नगर, एन पाच सिडको (02), एन दोन (01), लाडगाव (01), सुंदरवाडी (01),  सावंगी (01),  बीड बायपास (01), मनजित प्राईड (07) नक्षत्रवाडी (1), कांचनवाडी (01),  शिवाजी नगर (01), शहानूरमियाँ दर्गा (01), शुभ लाभ सोसायटी (02), बजाज नगर, वाळूज (01),  वडगाव कोल्हाटी (01),  सिरसगाव (01), वंजारवाडी, माळीवाडा (01),  भारत नगर, एन तेरा (04), एकता नगर (02), माऊली नगर (02),  राजे संभाजी कॉलनी  (01),  शिरोडी (01)

तेरा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत  गारखेडा परिसरातील 50  वर्षीय पुरुष, खुप्टा मदनीतील 71 वर्षीय स्त्री, नारळीबाग येथील 56 वर्षीय स्त्री, पंढरपूर वाळूजमधील 60 वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील 70 वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनी, गारखेडा परिसरातील 50 वर्षीय पुरुष, माहोरा कन्नडमधील 48 वर्षीय पुरुष, एन नऊ शिवनेरी कॉलनीतील 65 वर्षीय पुरुष, निखेडा – फुलंब्रीतील 69 वर्षीय पुरुष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मल्हार चौकातील 70 वर्षीय स्त्री व खाजगी रुग्णालयांत जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळील अशोक नगरातील 60 वर्षीय पुरुष, खिंवसरा नगर, बिडकीन येथील 51 वर्षीय पुरुष, श्रीकृष्ण नगरातील 78 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *