परभणी जिल्ह्यात 824 रुग्णांवर उपचार सुरू, 78 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 18 :- जिल्ह्यातील 78 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4398 एवढी झाली आहे. त्यापैकी 3391 बरे झाले तर 183 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 824 जणांवर उपचार सुरु आहेत.

गुरुवार दि.17 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 72 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1670 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 824 असून रिक्त बेडची संख्या 831 आहे. असेजिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *