ज्येष्ठ शिवसैनिक हेच शिवसेनेचे कवच कुंडल – शिवसेना नेते संजय राऊत 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा  ज्येष्ठ शिवसैनिकांचा संकल्पछत्रपती संभाजीनगर :-

छत्रपती संभाजीनगर , ७ जून / प्रतिनिधी :- शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात कोणी हिंदू-मुस्लिम दंगलीत आपले कुटुंब गमावले, कोणी कोणतेही पद नसताना आयुष्य संघटनेसाठी दिले,कोणी सत्तेची कोणतीही लालच नसताना हिंदुत्वासाठी आयुष्यभर कार्य केले.काहींनी गद्दार पदाधिकाऱ्यांचा सभा उधळल्या.हे रोमहर्षक क्षण  त्या निस्वार्थ ज्येष्ठ शिवसैनिकांचे आहेत ज्यांनी फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षासाठी कष्ट घेतलेले आहे. ४० आमदारांनी गद्दारी केलेली असली तरी शिवसेनेचे कवच कुंडल हे ज्येष्ठ शिवसैनिकच आहेत.त्यांनीच या संघटनेचा पाया निर्माण केला असून शिवसेनाप्रमुख व शिवसैनिक हे दोनच पद शिवसेनेत शाश्वत आहेत. आपल्यासारख्या अनुभवी व ज्येष्ठ शिवसैनिकांचे आम्हाला मार्गदर्शन लागणार असल्याचेही शिवसेनेचे नेते खासदार  संजय राऊत यांनी सांगितले. 

ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार व संवाद कार्यक्रम प्रसंगी खासदार संजय राऊत  बोलत होते.शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून १९८५ पासून कार्य करणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा राज्यसभा खासदार व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या समवेत अल्पोहार व संवाद पर कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी अनेक जुने प्रसंग उजेडास आले.याप्रसंगी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर जिल्हाप्रमुख राजू राठोड जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांचे प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना हा कधीही न संपणारा पक्ष असून आगामी काळात आम्ही गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावरती आम्हाला विश्वास असून त्यांना परत एकदा मुख्यमंत्री बनविण्यासाठी आम्ही संघटनेच्या कामासाठी पुढाकार घेणार असल्याचा संकल्प यावेळी जेष्ठ शिवसैनिकांनी केला.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक नरेश पूरवार, रमेश सुपेकर, जय महाराष्ट्र देशमुख, परशुराम वाखुरे, भरत लकडे, चंद्रकांत दहीहंडे, अविनाश कुमावत, अशोक बावस्कर, वसंत बावस्कर, अशोक आरगडे, कल्याण एडके, राधाकिसन मोटे, सदानंद शेळके, अरुण तुपे, नाना पळसकर रमेश दहीहंडे, सुभाष दत्तू पाटील, राजू पवार, सुभाष साबळे, चंद्रकांत झळके, खंडू पाटील वाघ, रामभाऊ ठोंबरे, संपत शेजुळ, दत्ता दारुंटे, विश्वंभर जिजा शिंदे, गाडेकर मामा, मुक्तेश्वर खंडागळे, बाबुराव भोसले, भागोजी दगडफोडे, ज्ञानेश्वर मरकड, मोहनराव साळुंखे, सावळीराम गाडे, अशोक निमसे, भानुदास पिंपळे, सिताराम भराडे ,बबन मोगल, शेषराव शिरसे, कल्याण परदेशी, राजू कुलकर्णी, मच्छिंद्र हाडे, कमलाकर वानोळे, दादाराव तायडे, नारायण जाधव, सदाशिव कापडे, सुभाष भांबर्डे, सुभाष वडगावकर, राजू बोधेकर ,रवींद्र भिल्ला, प्रताप उदा राठोड ,धनाजी मनगटे, उमेश तिवारी, सतीश पाखले, रमेश  अमराव , तसेच महिला आघाडीच्या अनुसया शिंदे, मालती भोसले, राधाबाई तळेकर, चंद्रकला चौहान या ज्येष्ठ शिवसैनिकांचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत  यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.