पी.जी. उत्तीर्ण झालेल्या 1600 डॉक्टरांची सेवा कोविड उपचारासाठी उपलब्ध करून देणार-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

लातूर जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता नाही, प्रतिदिन मागणी 13 किलो लिटरची ,पुरवठा 26 किलो लिटरचा
  • जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेड ऑक्सिजन नेट करण्याचे आदेश
  • कोविड च्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पुरेसा औषधी साठा उपलब्ध
  • जिल्ह्यांतर्गत खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे संबंधित यंत्रणांना निर्देश
  • वैद्यकीय प्रवेशासाठी “वन महाराष्ट्र वन मिरीट” हे सूत्र स्वीकारलेले आहे
  • covid-19 उपचारासाठी अधिकचे बिल तक्रारीची तात्काळ दखल घेऊन न्याय मिळवून देणार

लातूर, दि.17:- वैद्यकीय शिक्षण विभागाने पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील 1 हजार 600 डॉक्टरांची सेवा आवश्यकतेनुसार राज्यातील कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, राज्यात कोविड उपचारासाठी कोठेही डॉक्टरांची कमतरता राहणार नाही यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकत्याच वैद्यकीय शिक्षणात पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेल्या 1600 डॉक्टरांची सेवा कोविड उपचारासाठी राज्यभर आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात कोठेही ही डॉक्टरांचे कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

अलीकडेच राज्य शासनाने वैद्यकीय प्रवेशासाठी 40 वर्षांपासून असलेली 70-30 ची अट रद्द करून वैद्यकीय प्रवेशातील असमतोल दूर केला आहे. शासनाने “वन महाराष्ट्र वन मेरिट” हे सूत्र स्वीकारले असून यातून गुणवंतांना न्याय देऊन गुणवंत महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा निर्धार आहे, आहे माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त करण्यासाठी राज्यभर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात आहे. आजच्या मुक्ती दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील सुमारे 27 लाख लोकसंख्येसाठी व साडेचार लाख कुटुंबासाठी 1600 आरोग्य पथकांची स्थापना केली असून दिनांक 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ही मोहीम जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे, असे माहिती श्री देशमुख यांनी दिली.देशात सर्वत्र ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झालेला होता. राज्य शासनाने ऑक्सीजन ची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून उद्योगांना 20% अक्सिजन व वैद्यकीय कारणासाठी 80% ऑक्सिजन पुरवठा ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनी करावा असे निर्देश दिलेले आहेत अशी माहिती पालकमंत्री देशमुख यांनी दिली. तसेच लातूर जिल्ह्याला वैद्यकीय कारणासाठी प्रतिदिन 13 किलो लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असून 26 किलोलिटर पुरवठा प्रतिदिन करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली व त्या अनुषंगाने आजच 26 किलोलिटर ऑक्सिजन पुरवठा जिल्ह्याला प्राप्त झालेला असून जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र शासनाने मार्च 2021 मध्ये कोरोना प्रतिबंध ची लस उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे हा कोरोना पासून बचावाचा एकमेव उपाय असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील सर्व बेफा ऑक्सिजन नेट करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ज्या खासगी रुग्णालयातून कोविड उपचाराबाबत अधिकचे बिल घेण्यात येत असेल तर त्या बाबतच्या तक्रारी प्रशासनाला द्याव्यात त्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करून त्या रुग्णांना न्याय मिळवून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला शेंगाची कमी लागण झालेली दिसून आल्याने त्याबाबतचे प्रशासनाने पंचनामे केले आहेत तसेच पाऊस वारा यामुळे ऊस पिकाचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून सोयाबीन व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पालकमंत्री देशमुख यांनी दिली.यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला आहे. परंतु पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे त्यामुळे प्रवास करणे धोकादायक झालेले आहे त्या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्ती व रस्त्यावरील पूलांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही पालकमंत्री देशमुख यांनी दिली. यावेळी प्रसार माध्यम प्रतिनिधींनी कोरोना व विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पालकमंत्री देशमुख यांच्याकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *