पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडून अभिवादन

मुंबई, ३१ मे  / प्रतिनिधी :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सहकारमंत्री अतुल सावे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार राजू नवघरे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

सहकारमंत्री श्री. सावे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. अहिल्यादेवींनी घाट बांधणे, विहिरी, तलाव, मंदिरे यांचे बांधकाम करून चांगले उपक्रम राबवून समाजकार्य केले. बांधलेली मंदिरे सुरक्षित ठेवण्यासह समाजोन्नतीसाठी प्रयत्न केले असून त्यांचा आदर्श ठेवायला हवा, असे श्री. सावे म्हणाले.