Skip to content
Friday, June 9, 2023
Latest:
  • हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्मारक उभारणार-पालकमंत्री संदीपान भूमरे
  • महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर
  • खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
  • नांदेड विमानतळाच्या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा
  • लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर
aajdinank logo

आज दिनांक

अपडेट झटपट

  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • दिनांक स्पेशल
  • मनोरंजन
  • देश विदेश
  • व्यापार
  • Contact
सहकार 

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

May 27, 2023May 27, 2023 Aaj Dinank Team A phone call from the office of the Minister of Cooperatives and a grant of Rs 50000 was deposited in the farmers account, Cooperation Minister Atul Save

मुंबई, २६ मे  / प्रतिनिधी :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास मदत झाली आहे.

राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानाचा लाभ राज्यातील सुमारे १४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांपर्यत हा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ पोहोचत नसल्याने शेतकरी थेट सहकार मंत्र्यांकडे निवेदने/तक्रार अर्ज देत आहेत. त्याची सहकारमंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातील अधिकारी दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही देखील करीत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलोरा येथील एक नियमित कर्जफेड करणारे वयोवृद्ध शेतकरी नथ्थु जाधव यांनी अनुदान मिळत नसल्याने याबाबत चौकशी व्हावी यासाठी थेट सहकार मंत्र्यांच्या नावे मंत्रालयातील कार्यालयात निवेदन/ तक्रार अर्ज दिले. बुधवारी (दि.२४) मंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी यांनी याची दखल घेत तात्काळ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली. यात शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभासाठी पात्र होते, मात्र बॅंक खात्याच्या आधार प्रमाणीकरणानंतर नावातील फरकामुळे हे अनुदान अडले होते. ही तांत्रिक अडचण लक्षात येताच ती तत्काळ दूर करून शेतकऱ्याला लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना त्यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर त्याच दिवशी शेतकरी जाधव यांच्यासह १२ शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या खात्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले. सदर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले की नाही याचा पाठपुरावा करून खात्रीदेखील मंत्री कार्यालयाने करुन घेतली.

हा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाल्याने वयोवृद्ध शेतकरी नथ्थु जाधव यांनी समाधान व्यक्त करुन सहकारमंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आभार मानून त्यांच्या कामाचे कौतुकही केले. या उदाहरणातील तत्परतेतून विभागाची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. राज्य शासनाचे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान नक्कीच बळीराजाला प्रोत्साहन देणारे ठरेल.

“राज्य शासन आणि सहकार विभाग महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३ लाख ९० हजार इतक्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनाने ५ हजार ५५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सहकार विभाग आणि आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना नेहमी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिबीर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या जातील,” अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.

  • ← छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस
  • राज्य शासनाच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांची गतीने अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस →

You May Also Like

सर्वसामान्यांना उभारी देणाऱ्या मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी बँका होण्यासाठी शासन मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 9, 2022August 9, 2022 Aaj Dinank Team

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्य

January 25, 2023January 25, 2023 Aaj Dinank Team

राज्यातील साखर कारखाने केंद्रामुळे वाचले-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

July 10, 2021July 10, 2021 Aaj Dinank Team

ताज्या बातम्या

हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्मारक उभारणार-पालकमंत्री संदीपान भूमरे
छत्रपती संभाजीनगर हैदराबाद मुक्तिसंग्राम  दिन  

हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्मारक उभारणार-पालकमंत्री संदीपान भूमरे

June 9, 2023June 9, 2023 Aaj Dinank Team

हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आढावा छत्रपती संभाजीनगर , ८ जून / प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे स्मृती

महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर
देश विदेश 

महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर

June 9, 2023June 9, 2023 Aaj Dinank Team
खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
शेती -कृषी  

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

June 9, 2023June 9, 2023 Aaj Dinank Team
नांदेड विमानतळाच्या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा
नांदेड  

नांदेड विमानतळाच्या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा

June 9, 2023June 9, 2023 Aaj Dinank Team
लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर
महाराष्ट्र राजकारण 

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर

June 9, 2023June 9, 2023 Aaj Dinank Team

About Us

www.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.

कॅलेंडर

June 2023
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« May    

संपर्क

ईमेल: [email protected]

[email protected]

मोबाईल नंबर -८४८४०३०७८१

पत्ता :
आज दिनांक मीडिया सर्व्हिसेस

शॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१

 

Copyright © 2020.AajDinank Powered by Ashvamedh Software.