माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील माहीम येथे हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आय.सी.यू. मध्ये उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे जोशी यांची विचारपूस करण्यासाठी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह हिंदुजा रुग्णालयात गेले होते.