वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कार्यशाळा ; गुन्हेगारीला आळा बसणार

वैजापूर ,२​​३ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत अद्यावत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी व याबाबत जनजागृती करण्यासाठी येथील द्रौपदी लॉन्समध्ये मंगळवारी (ता.23) कार्यशाळा घेण्यात आली.

जिल्हा ग्रामीण पोलिस दल व जिल्हा परिषदेतर्फे पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला सहायक अधीक्षक महक स्वामी, प्रभारी उपविभागिय अधिकारी राहुल गायकवाड, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के‌.गोर्डे, शांतता समितीचे सदस्य प्रकाश बोथरा, धोंडिरामसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक गोर्डे यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने कशाप्रकारे गुन्हे थांबवता येतील याची माहिती दिली. चोरी, दरोडे व अन्य घटनांबाबत नागरिकांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर (१८००२७०३६००) संपर्क साधल्यास निश्चितपणे गुन्हेगारीला आळा घालता येईल. अशा प्रकारची यंत्रणा सध्या पुणे, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात सुरू असुन तेथे चांगले परिणाम दिसुन आल्याचे यावेळी सांगण्यात आले. महक स्वामी व राहुल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गट विकास अधिकारी एच.आर.‌बोयनर, एपीआय विजय नरवडे, कल्याण पवार, वरिष्ठ अधिकारी गणेश लोकरे, मकरंद कदम, गोपनीय शाखेचे विजय घोटकर, गणेश पैठणकर, गणेश पठारे, सूर्यकांत मोटे आदींची उपस्थिती होती.