वैजापूर शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वैजापूर ,२​​३ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील यशवंत कॉलनी भागात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी(ता.23) सकाळी उघडकीस आली. तेजस सोपान काळे (27 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचे कारण लगेच समजू शकले नाही.

सकाळी लवकर उठला नाही म्हणुन घरातल्यांनी खोलीत पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.‌ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.