नांदेड जिल्ह्यात 255 बाधितांची भर तर नऊ जणांचा मृत्यू

325 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 16 :- बुधवार 16 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 325 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 255 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 110 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 145 बाधित आले. आजच्या एकुण 918 अहवालापैकी 617 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 12 हजार 437 एवढी झाली असून यातील 8 हजार 234 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 810 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण 9 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे रविवार 13 सप्टेंबर रोजी साखोजीनगर नांदेड येथील 52 वर्षाचा एक पुरुष, सोमवार 14 सप्टेंबर रोजी चिवळी मुखेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बसवंतनगर नांदेड येथील 24 वर्षाची एका महिलेचा, बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील 40 वर्षाच्या एका महिलेचा, मंगळवार 15 सप्टेंबर रोजी धानोरा ता. धर्माबाद येथील 55 वर्षाची एक महिला, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राधिकानगर नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, दिनांक 15 सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल वजिराबाद नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, दिनांक 16 सप्टेंबर रोजी धानोरा ता. नायगाव येथील 70 वर्षाची एक महिला, गोकुंदा किनवट येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 330 झाली आहे.

आज बरे झालेल्या 325 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 110 तर अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 145 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 810 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 67 हजार 685,निगेटिव्ह स्वॅब- 52 हजार 224,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 255,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 12 हजार 437,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 24,एकूण मृत्यू संख्या- 330,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 8 हजार 234,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 810,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 54, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 45,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 68.37 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *