परभणी जिल्ह्यात 846 रुग्णांवर उपचार सुरू, 52 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 16 :- जिल्ह्यातील 52 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4249 एवढी झाली आहे. त्यापैकी 3227 बरे झाले तर 176 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 846 जणांवर उपचार सुरु आहेत. मंगळवार दि.15 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 67 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1697 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 846 असून रिक्त बेडची संख्या 851 आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *