२ हजारची नोट बंद होणार; ‘या’ तारखेपर्यत बँकेत जमा करण्याचे आदेश

मुंबई, १९ मे  / प्रतिनिधी :-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ही नोट चलनातून बाद करण्यात येणार आहे. सध्या ही नोट चलनात असणार आहे. मात्र, ३० सप्टेंबर पर्यंत २ हजाराच्या नोटा या बॅंकेत जमा कराव्या लागणार आहेत. त्यानंतर या नोटात चलनात स्विकारल्या जाणार नाहीत. या नोटांची छपाई देखील बंद करण्यात आली आहे. २०१६ मध्ये हजार आणि ५०० च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २ हजारची नोट चलनात आली होती.आरबीआयच्या या निर्णयानंतर येत्या काही दिवसांत या नोटांवर बंदी घातली जाणार का आणि तुम्ही लगेच काय करायचे हे दोन प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत.

२००० रुपयांच्या नोटा बंद होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रश्नाचे थेट उत्तर देणे सध्या अवघड आहे, पण येत्या महिनाभरात २००० रुपयांच्या नोटा बंद होणार हे नाकारता येणार नाही. परंतु आरबीआयने घेतलेल्या ताज्या निर्णयाचा अर्थ असा आहे की या नोटा यापुढे चलनात राहणार नाहीत आणि ३० सप्टेंबर २०२३ नंतर या नोटा देखील बँकेच्या चलनातून काढून टाकल्या जातील. 

नोट बंद होणार की नाही, याचे उत्तर मिळायला वेळ लागेल, पण या निर्णयाचा अर्थ निश्चितपणे ही नोट बंद करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असल्यास लगेच काय करावे?
याचे साधे उत्तर आहे की आता घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण ही नोट बंद करण्यात आली नसून चलनातून बाहेर काढली जात आहे, म्हणजेच ही नोट टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे. तुम्ही आता बाजारात गेलात तर तुम्ही त्याद्वारे व्यवहार करू शकाल, पण तुमच्याकडे या नोटा असतील तर त्या आरामात बँकेत परत करा आणि इतर नोटा घ्या. 

नोटा बदलून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण वेळ मिळेल. 
३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत २००० रुपयांच्या नोटा बदलता येतील. २३ मे पासून कोणत्याही बँकेत बदलता किंवा जमा करता येईल. २०००० रुपये एकावेळी बदलता येतात किंवा बँकेत जमा करता येतात. आरबीआयच्या १९ शाखांमध्येही नोटा बदलता येतील.आरबीआयने एक मोठा निर्णय घेत नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या घोषणेसोबतच २०००रुपयांची नोट जारी केली होती. ही नोट ८ वर्षांनंतर चलनात येणार नाही.