महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त वैजापुरात शांतता कमिटीची बैठक ; मिरवणुकीस पोलिस प्रशासनाची परवानगी

वैजापूर ,१९ मे  / प्रतिनिधी :- हिंदवी सुर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथी नुसार जेष्ठ शुध्द -३ म्हणजे  सोमवारी (ता.22) साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक  संजय लोहकरे यांच्या उपस्थितीत  पोलिस स्टेशन वैजापुर येथे शुक्रवारी (ता.19) शांतता समिती सदस्य व उत्सव समिती पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत ​ उपस्थितांच्या विनंतीनुसार उत्सव समितीला काही अटी टाकुन मिरवणुकीस परवानगी देण्यात आली.

मिरवणुकीत शांतता राखावी, रात्री  दहाच्या आत मिरवणूक संपवावी, ठरलेल्या मार्गाने मिरवणूक न्यावी व मिरवणूकीत सर्व जबाबदार  पदाधिकाऱ्यांनी विसर्जन पर्यंत उपस्थित रहावे. या अधिन राहुन परवानगी दिली. प्रास्ताविक शांतता समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. त्यांनी जयंती कार्यक्रम रुपरेषा सादर केली. नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनीही मिरवणूक  शांततेत राहिल व शेवटपर्यत मिरवणूकीत उपस्थित राहू असे आश्वासन दिले. 

या प्रसंगी शांतता समिती सदस्य प्रकाशचंद बोथरा, सदर काझी हाफिजोद्दींन, भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक  गणेश खैरे, राजपूत युवक क्षत्रीय संघटनेचे धीरजसिंह राजपूत, सोनू राजपूत, प्रेम राजपूत, संजय राजपूत, सागर राजपूत, गौरव दौडे, सागर सूरजमल राजपूत,  सम्राट राजपूत, ज्ञानेश्वर सिरसाट यांच्यासह उत्सव समिती सदस्य उपस्थित होते.