राज्यात दिवसभरात २० हजार ४८२ रुग्णांची नोंद, 515 जणांचा मृत्यू

मुंबई, 15 सप्टेंबर : आज राज्यात 515 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे. आतापर्यंत राज्यात 30409 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आजच्या दिवसात राज्यात 20482 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले असून 19423 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 775273 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 70.62 % एवढे झाले आहे.

राज्यात आज ५१५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.77 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5409060 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 1097856 (20.29 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1734164 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 37225 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 291797 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *