काँग्रेसने ७० वर्षात केले नाही, ते ९ वर्षात मोदी सरकारने केले – जे. पी. नड्डा

पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही, पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली व मोदी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. ७० वर्षात काँग्रेसने केले नाही ते ९ वर्षात मोदी सरकारने केले असे ते म्हणाले.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरूवारी झालेल्या या बैठकीला ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार, विनोद तावडे, उपस्थित होते.
नड्डा म्हणाले, जगातील ३ र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची आहे. मोबाईल ऊत्पादन भारत पुढे. रेल्वे, रस्ते अशा सर्व क्षेत्रात पुढे. कोरोनाची मार सर्व जगाला बसला. पण भारताला नाही. कारण मोदींनी संकटाला संधी मानले. राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतूक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने सुरु केल्याने सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. ही कामे सामान्य माणसापर्यंत नेऊन निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. 

श्री. नड्डा यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या कामामुळेच ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. त्यामुळेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. कोरोना संकटाचे मोदी सरकारने संधीत रूपांतर केल्यामुळे भारताचा जीडीपी जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा ठरला आहे. नेपाळ, श्रीलंका यासारख्या अनेक देशांना संकटात मदत करून भारताने आपली नवी ओळख निर्माण केली आहे.

काँग्रेसच्या काळात सीमावर्ती भागातील रस्त्यांसारख्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. मोदी सरकारने सीमावर्ती भागात चौपदरी रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. देशभर द्रुतगती महामार्ग, चौपदरी रस्ते, महामार्ग यांची कामे मोठ्या वेगाने सुरु आहेत. गेल्या ८ वर्षांत विमानतळांची संख्याही वाढली आहे. वंदे भारत सारखी नवभारताचा चेहरा असणारी रेल्वे सुरु झाली आहे, असेही श्री. नड्डा यांनी सांगितले.

श्री. नड्डा म्हणाले की, भाजपा हा केवळ सत्तेचे राजकारण करणारा पक्ष नाही. कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यांनी कोट्यवधी जनतेची सेवाभावाने मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ७ सूत्रांचे आचरण करण्यास सांगितले आहे. सामान्य माणसाच्या भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद ठेवत सेवाभाव वृत्ती जोपासली पाहिजे.

राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी संघटनात्मक बाबींविषयी कार्यसमिती बैठकीत मार्गदर्शन केले.

पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी त्यांचे स्वागत केले.