पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ नंतर विविध कल्याणकारी योजना राबवून गरीब जनतेला बँकिंग क्षेत्राचे लाभ मिळवून दिले : केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांचे प्रतिपादन
नागपूर,१३ मे / प्रतिनिधी :- भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असून १४० कोटी लोकसंख्येच्या देशात आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ नंतर विविध कल्याणकारी योजना राबवून गरीब जनतेला बँकिंग क्षेत्राचे लाभ मिळवून दिले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नागपूरात केले. स्थानिक कस्तुरचंद पार्क जवळील परवाना भवन, येथे आयोजित क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमा अंतर्गत 11 हजार लाभार्थींना 971 कोटीं रुपयाचे कर्जे वितरीत करण्यात आली.

गरीब जनतेला बँकद्वारे मदत करण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना सुरु करण्यात आली. या योजनेमधून असंख्य लोकांनी आपली खाती बँकेत उघडली. जन धन योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मुद्रा योजना, स्टँड अप योजना यासारख्या योजेनेचा लाभ जनसामान्यांनी घ्यावा, असे आवाहन कराड यांनी केले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमधून कोणत्याही हमी शिवाय कर्ज उपलब्ध होत असून डिजिटल व्यवहारावर या योजनेच्या लाभार्थ्यांनी भर द्यावा असे त्यांनी यावेळी नमुद केले. ग्राहकांनी बँकेला आपल्या व्यवसायाचे भागीदार बनवावे, बँकेशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवावा तसेच ग्राहकाला ही पूर्ण मदत व्हावी म्हणून बँकेने प्रयत्नशील रहावे, असेही त्यांनी सांगितले.
9REV.jpeg)

या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी विविध बँकेच्या दालनाला भेट दिली. या कार्यक्रमास विविध बँकेचे अधिकारी, योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.