जातेगावात घरफोडी ; ६२ हजारांचा ऐवज लंपास

वैजापूर ,१३ मे  / प्रतिनिधी :- विरगाव (ता.वैजापूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत जातेगाव येथे घराला कुलुप असल्याची संधी साधत चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला‌. ही घटना १३ मे रोजी सकाळी उघडकीस आली.
जातेगाव येथील जलाल बाबु सय्यद हे १० मे रोजी पत्नी व दोन मुलांसह नातेवाईकांना दवाखान्यात भेटण्यासाठी सिन्नरला गेले होते. १३ मे रोजी सकाळी भावाने फोन करुन घराचा दरवाजा उघडा असुन घरातील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे कळवल्यानंतर जलाल यांनी तातडीने घरी येऊन सामान तपासले असता  घरातील रोख रुपये दहा हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे लक्षात आले.पोलिसांना कळवल्यानंतर श्वानपथक व अंगुलीमुद्रा पथकास पाचारण करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.