समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचा छापा

मुंबई, १२ मे  / प्रतिनिधी :-आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. समीर वानखेडेंच्या घरी सीबीआयचा छापा; आयर्नखानच्या नातेवाईकांना लाच मागितल्याचे प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने अहवाल दिल्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले. यासह कार्डेलिया क्रूझ केसमध्ये लाच मागितल्याच्या प्रकरणी वानखेडेंसह इतरांवरही बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतरांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मुंबईतील परिसराची झडती घेण्यात आली. वानखेडे हे यापूर्वी एनसीबी (मुंबई झोन) प्रमुख होते आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते.

क्रूज ड्रग्ज प्रकरणी चर्चेत

समीर वानखेडे एनसीबीमध्ये असताना त्यांनी शाहरुख खानच्या मुलाविरुद्ध ड्रग्ज प्रकरणाचा तपास केला होता. त्यावेळी ते एनसीबीचे प्रमुख होते. न्यायालयाने आर्यनला जामीन मंजूर केला आणि त्याच्यावरील ड्रग्जचा खटला मागे घेतला.