…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती, राजीनाम्यावरून फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई :-सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. तसंच शिंदे सरकारला मोठा दिलासा दिला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपणे विजय झाला आहे. हा निकाल यातले ४-४ महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो.

उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राजीनाम्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं. मी नैतिकतेपोटी राजीनामा दिला असं त्यांनी सांगितलं. या प्रतिक्रियेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली, नॉर्मली मी बघत नाही. मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असं ते म्हणाले, भाजपसोबत निवडून आलात आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात तेव्हा ही नैतिकता कोणत्या डब्यात गेली होती? असा प्रश्नही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

तुम्हा आम्हाला  नैतिकता सांगू नये 

नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये, कारण खुर्चीकरता तुम्ही विचार सोडला. शिंदेंनी विचाराकरता खुर्ची सोडली. ते सरकारमधून विरोधात आले कारण आम्ही तेव्हा विरोधात होतो. तुमच्याकडे नंबर नाही ते तुमच्या लक्षात आलं होतं, या लाजेपोटी, भीतीपोटी तुम्ही राजीनामा दिलात. त्याला नैतिकतेचा मुलामा लावू नका. एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यायचा प्रश्नच उद्बवत नाही. त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं. 

न्यायालयाचा हस्तक्षेपाला नकार

महाविकासआघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरत उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही हे कोर्टाने सांगितलं. डिसक्वालिफिकेशनच्या पिटिशनचा अधिकार हा स्पीकरचा आहे, त्यामुळे स्पीकर यावर सुनावणी घेतील हे स्पष्ट झालं आहे. कोणतीही एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन नाही त्यामुळे कोर्टाने हस्तक्षेप करायला नकार दिलाय. ज्यांच्यावर डिसक्वालिफिकेशन पेंडिग आहे त्यांना पूर्ण अधिकार आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

राज्यपालांच्या कृतीचं समर्थन

राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावणं समर्थनीय असल्याचं न्यायालयाने म्हणलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शंकेचं निरासन केलं असावं, अर्थात ते सर्वोच्च न्यायालयाला मानत असेल तर असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.