महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष :काहीही झाले तरी निकाल आमच्याच बाजूने लागणार – आ.रमेश बोरणारे

वैजापूर ,१० मे  / प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाले असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 16 आमदार अपात्र ठरणार की सरकार कोसळणार ? याविषयी सद्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काहीही झाले तरी निकाल आमच्याच बाजूने लागणार असे अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या सोळा आमदारात समावेश असलेले वैजापूरचे आ.रमेश पाटील बोरणारे यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकालाविषयी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन आम्ही सत्ता स्थापन केली चूक केली नाही. लोकशाही मार्गाचा विचार केला तरी निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. पक्षाने नोटीस व व्हीप काढले त्याच्या विरोधात जाऊन आम्ही मतदान किंवा चूक केली नाही.आमचे विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले असले तरी निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. 16 आमदार पात्र ठरणार आहेत. आणि विराधात निकाल गेला तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहून जोमाने काम करणार असल्याचे आ.बोरणारे यांनी मुलाखतीत म्हटले आहे.