वैजापुरात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वैजापूर ,१० मे  / प्रतिनिधी :- भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येवला रस्त्यावर घडली. सुशिल राजेंद्र चव्हाण (वय 20 वर्ष) असे मृताचे नाव असून तो वैजापूर शहरातील धरणग्रस्त नगर भागात राहणारा होता.

सुशिल राजेंद्र चव्हाण

दुचाकीवर (एमएच 20 बीसी 1278)  जात असतांना येवल्याकडून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच 14 बीएच 6132) या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सुशिल याच्या डोक्याला गंभीर दुखापती झाली. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.‌