परभणी जिल्ह्यात 820 रुग्णांवर उपचार सुरू, 186 रुग्णांची वाढ
परभणी, दि. 15 :- जिल्ह्यातील 186 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4185 एवढी झाली आहे. त्यापैकी 3209 बरे झाले तर 156 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 820 जणांवर उपचार सुरु आहेत. सोमवार दि.14 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 67कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1697 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 820 असून रिक्त बेडची संख्या 877 आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.