अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व बँक ऑफ इंडियात सामजस्य करार

पुणे ,९ मे  / प्रतिनिधी :-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत-जास्त मराठा उद्योजक घडविण्याकरीता बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्यात 08 मे 2023 रोजी करार करण्यात आला. पुणे विभागीय जनरल मॅनेजर श्री. राघाकांत यांच्या उपस्थितीत सामजस्य करार झाला. यावेळी बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर रविंद्र बोगा, डेप्युटी जनरल मॅनेजर लगणजीत दास डेप्युटी जनरल मॅनेजर, समीर देशपांडे चिफ मॅनेजर बँक ऑफ इंडिया व महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील उपस्थित होते.

            राज्यातील सर्व बँक ऑफ इंडियाच्या शाखांना पत्रकाद्वारे या कराराची माहिती देण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून महामंडळाच्या लाभर्थ्यांना CGTMSE व CGFMU या दोन क्रिएट गँरटी देण्यात येणार आहेत. जे तरुण क्रेडिट गँरटीच्या माध्यमातून कर्ज मागणी करतील त्यांना याचा लाभ देण्यात येईल. जास्तीत-जास्त करुन महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन, राज्यात उद्योजक होतील या दृष्टीने शासन आणि महामंडळ प्रयत्नशील आहे.

            आज रोजी करण्यात आलेला सामजस्य करार हा पुणे, कोल्हापुर, सोलापुर, नाशिक, रत्नागिरी, नागपूर संपूर्ण विदर्भ या भागासाठी करण्यात आला असून या बाबतचे अधिकृत पत्रक बँक ऑफ इंडिया पुढील कालावधीत प्रसिद्ध करणार असून त्यानंतर या करारची अंमलबजावणी सुरु होईल.

             सामजस्य कराराप्रमाणेच या अगोदर देखील मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे कोकण विभागासाठी या प्रकारचा करार करण्यात आला आहे. या पूर्वीच्या या करारचा लाभ या विभागातील लाभार्थ्यांना झालेला आहे.

             मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात 1 लक्ष मराठा उद्योजक होण्याच्या दृष्टीने या करारमुळे लाभ होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.