छत्रपती संभाजीनगर:चेंबरमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर ,८ मे  / प्रतिनिधी :- चेंबरचे काम करताना चार जण बुडाल्याची धक्कादायक घटना सलीम अली सरोवर परिसरात मोकळ्या जागेत घडली. चेंबरमध्ये बुडालेल्या चौघांपैकी तिघांचा ​ मृत्यू झाला असून, इतर एकाची  प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर घटनेची महिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी घाटी परिसरात धाव घेतली. अंकुश बाबासाहेब थोरात (वय 32 वर्षे, हिमायत बेग भिमराज नगर), रावसाहेब सदाशिव घोरपडे (वय 33 वर्षे, रा. हिमायत बेग भिमराज नगर),, विष्णू उगले (रा. हिमायतबाग) असे मृत कामगारांचे नावं असून, विष्णबाळू विश्राम खरात यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी घाटी धाव घेत घाटी रुग्णालयासमोर टाहो फोडाला.

चेंबरमध्ये बुडालेले चारही जण मोल मजुरीचं काम करायचे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम मिळत नव्हते. अशात शहरातील मलजल प्रक्रिया केंद्र परिसरात असलेल्या चेंबरचे काम असल्याचे त्यांना कळाले होते. दरम्यान काम मिळाल्याने ते सर्वजण मलजल प्रक्रिया केंद्र परिसरात कामावर गेले. दरम्यान काम करता असतानाच यातील एक जण चेंबरमध्ये बुडाला असल्याचे त्याच्यासोबत असलेल्या इतर कामगारांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी दुसरा आतमध्ये गेला, पण तो देखील आतमध्ये बुडाला. दोघेजण आतमध्ये बुडत असल्याचे पाहून आणखी दोघेजण त्यांना वाचवण्यासाठी आतमध्ये गेले, पण ते देखील पाण्यात बुडाले. 

ही बाब इतरांच्या लक्षात येताच असतात अराडाओरड करून त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना तात्काळ घाटी रुग्णाला दाखल करण्यात आले. या पैकी तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर एका कामगारावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिनगारे करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.