गोदावरी पब्लिक स्कुलमध्ये भरला माजी विद्यार्थांंचा ‘ओढ’ मेळावा

छत्रपती संभाजीनगर ,४ मे  / प्रतिनिधी :-गोदावरी पब्लिक स्कुलमधून १९९९ला दहावी उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थ्यांनी  एकत्र येऊन बालवर्ग मित्रांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम घेतला.या माजी विद्यार्थी मेळाव्याला ‘ओढ’ हे नाव देऊन आपुलकीची ओढ निर्माण केली.  

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रॉकसॉल्ट हॉटेल बीड बाय  पास  येथे मेळावा झाला.  तत्पूर्वी सर्व माजी विद्यार्थी हे गोदावरी पब्लिक स्कुल मध्ये जाऊन झेंडा वंदन करून, आजी माजी शिक्षक यांना  भेटून जुन्या आठवणींना  उजाळा दिला. शिक्षकांशी संवाद साधताना  विद्यार्थी भावुक झाले होते  शिक्षकही जुन्या विद्यार्थींना भेटून आनंदी झाले होते.

शाळेतर्फे मुख्यध्यापक श्री परदेशी  यांनी सर्व विद्यार्थ्यांचा स्वागत केले. त्या वेळी साळूंके सर, बहिरगावकर मॅडम, पाटील मॅडम त्यावेळचे शिक्षक उपस्थित होते.  तेथून विद्यार्थी हे नियोजित स्थळी हॉटेल रॉकसॉल्ट मध्ये  गेले, तेथे सर्वांचा परिचय  देणे, संगीत रजनी, हितगुज, व हयात नसलेल्या बालवर्ग मित्रांना श्रद्धांजली वाहिली.

मेळाव्यात संगीत खुर्ची, अंताक्षरी, एक मिनिट स्पर्धाचा आनंद घेतला गेला. या मेळाव्या साठी बाहेर जिल्ह्यातुन म्हणजे नांदेड, धाराशिव, बुलढाणा,नाशिक, पुणे येथून बाल वर्ग मित्र उपस्थित  राहिले. या माजी विध्यर्थी मेळाव्यात ओढ फाऊंडेशनची घोषणा करण्यात आली. या फाऊंडेशन  मध्ये बाल वर्ग मित्र ,विद्यार्थ्यांच्या हितासाठी  कार्य केले जाणार आहे.

तब्बल दोन तपापूर्वीचे विद्यार्थी एकत्र आले.या स्नेह मेळाव्यासाठी सचिन गायकवाड, अनिल कचके, रितेश कुलकर्णी, प्रवीण सोनवणे, डॉ.प्रेरणा मांवनतकर, भारत राशिनकर,ज्योती पवार आणि सागर रोडे यांच्या प्रयत्नामुळे हा मेळावा यशस्वी झाला.  या मेळाव्या साठी ७० विद्यार्थी एकत्र आले होते.