राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे कोणाकडे सुप्रिया सुळे की अजित पवार यांच्याकडे?

मुंबई, २ मे/प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली असून त्यांनी राजीनाम्यात अनेक भावनात्मक गोष्टींचा उल्लेख केला आहे. पवार यांनी काही दिवसांपूर्वी राजीनाम्याबद्दल संकेतही दिले होते. पवार यांनी ती घोषणा पक्षाच्या बैठकीत केली.

घोषणेनंतर पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा निर्णय मान्य करण्यास नकार दिला. ते सगळे पवारांना पटवण्यात गुंतले आहेत. प्रश्न हा हे की पवारांनी राजीनाम्याची घोषणा का केली? आता पक्षाचा नवा प्रमुख कोण असेल? अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्यात कोण जिंकणार? 

शरद पवार काय म्हणाले
‘माझ्या सहकाऱ्यांनो! मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत आहे. परंतु, सामाजिक जीवनातून निवृत्त होत नाही. सतत प्रवास माझ्या आयुष्याचा अभिन्न अंग बनला आहे. मी सार्वजनिक बैठका आणि कार्यक्रमांत सहभागी होत राहील. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली किंवा देशाच्या कोणत्याही ठिकाणी असलो तरी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी काम करीत राहीन. लोकांचे प्रेम आणि विश्वास माझा श्वास आहे. जनतेपासून मी वेगळा होत नाही. मी तुमच्यासोबत होतो व शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. आम्ही लोक भेटत राहू. धन्यवाद.

पवार म्हणाले की, ‘मला प्रदीर्घ काळ पक्षाच्या नेतृत्वाची संधी मिळाली. मी अध्यक्षपदाची अनेक वर्षे जबाबदारी पार पाडली. मला वाटते की ही जबाबदारी दुसऱ्या कोणी सांभाळावी. आता मी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत आहे.
 

पवारांनी हा निर्णय का घेतला
आम्ही हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे राजकीय विश्लेषक आनंद त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील राजकारणात हा मोठा निर्णय आहे. शरद पवार यांचे नाव महाराष्ट्रात खूप मोठे आहे. त्याशिवाय ते देशातीलही मोठे नेते आहेत. या परिस्थितीत त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करणे मोठा राजकीय संदेशही आहे. आनंद त्रिपाठी पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याची तीन कारणे सांगतात. 
 

१) पक्षातून येत होते विरोधाचे सूर: २०१९ मध्येही पक्षाच्या अनेक नेत्यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन सरकार बनवावे, असे वाटत होते. मात्र शरद पवार यांनी तसे केले नाही. त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षातून वेगळे होऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारही बनवले. तेव्हा अजित पवार उप मुख्यमंत्री बनले होते. फक्त एका दिवसानंतरच त्यांना राजीनामा द्यावा लागला. या घटनेनंतर शरद पवार यांच्या सांगण्यावरून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाड़ी स्थापन केली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांत पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला होता.
 

२) स्वतःचा अधिकार पारखू पाहतात पवार?: पक्षातून होत असलेला विरोध आणि वारंवार अजित पवार यांचे बंडाचे सूर या दरम्यान शरद पवार आपला अधिकार पारखू पाहत असावेत. जो पक्ष मी उभा केला आज त्याच्यासोबत किती लोक उभे आहेत हे त्यांना बघायचे असेल? 
याचा परिणामही बघायला मिळत आहे. मोठ्या संख्येत पक्षाचे नेते त्यांना मनवायला लागले आहेत. सगळे एका स्वरात बोलत आहेत की पक्षाचे अध्यक्षपद तुमच्याकडेच हवे. असाच प्रकार दोन वेळा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनीही केला होता. बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेना प्रमुखपद दोन वेळा सोडले होते आणि नंतर पक्षातील नेत्यांनी आग्रह केल्यावर पुन्हा ते घेतले होते. 

३) कुटुंबातील वाद वेळेपूर्वी मिटवायचाय: राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे कोणाकडे यावर पवार यांच्या कुटुंबात संघर्ष सुरू आहे. एकीकडे शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे तर दुसरीकडे पुतण्या अजित पवार आहे. पक्षाची सत्ता यावर पवार कुटुंबात संघर्ष आहे. शक्यता अशी की, शरद पवार आपल्या या निर्णयाच्या माध्यमातून कुटुंबातील वाद संपवण्याचा प्रयत्न करीत असावेत.

राजीनामा परत न घेतल्यास

कोण असेल अध्यक्ष

१) अजित पवार: अजित पवार महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते असून ते पक्ष प्रमुखपदासाठी सगळ्यात मोठे दावेदार आहेत. पक्षात त्यांचा अधिकार चालतो. पक्षावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. याच कारणामुळे जेथे शरद पवार स्वतः नसतात तेथे अजित पवार यांना पाठवले जाते. 

अजित पवार यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जाऊन २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. ही बंडखोरी केल्यानंतरही अजित पवार शरद पवार यांच्यासोबत गेले. महाविकास आघाड़ी सरकारमध्येही त्यांना उप मुख्यमंत्री पद दिले गेले होते.
उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यावरही शरद पवार यांनी अजित पवार यांना विरोधी पक्ष नेते बनवले. अजित पवार यांच्याकडे पवार नावाची मोठी शक्ती आहे. अशी शक्यता आहे की, पक्षाची सूत्रे अजित पवार यांच्याकडेच जातील.
 

२) सुप्रिया सुळे : शरद पवार यांची कन्या व पक्षाच्या लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे अध्यक्षपदाच्या दुसऱ्या सगळ्यात मोठ्या दावेदार आहेत. सुप्रिया तेज तर्रार व बोलण्यात बऱ्याच प्रसिद्ध आहेत. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्षपद सुळे यांना मिळावे. 

३) तिसऱ्याच्या हाती अध्यक्षपद लागेल :  अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात कौटुंबिक संघर्ष सुरूच राहिला तर शक्यता अशी की, अध्यक्षपद शरद पवार आपल्या विश्वसनीय नेत्याकडे देऊ शकतात. त्यामुळे घराणेशाहीचा आरोपही होणार नाही. असा प्रयोग नुकताच काँग्रेसनेही केला होता. काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष बनवले. पक्षाची शक्ती आजही गांधी कुटुंबाकडेच आहे.

जयंत पाटील: शरद पवार यांच्या निकटच्या नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत. जेव्हा अजित पवार यांनी बंडखोरी करून फडणवीस यांच्यासोबत सरकार बनवले तेव्हा शरद पवार यांनी अजित पवार यांना हटवून जयंत पाटील यांना विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले. जयंत पाटील यांचा संबंध एका मोठ्या राजकीय कुटुंबासी आहे. त्यांचे वडील राजाराम बापू पाटील १९६२ ते १९७० आणि १९७८ मध्ये महाराष्ट्रात मंत्री होते. १९८४ मध्ये राजाराम पाटील यांचे अचानक निधनानंतर जयंत पाटील यांना परत स्वदेशी यावे लागले. मायदेशी आल्यावर जयंत पाटील राजकारणात आले.

छगन भुजब: भुजबळ शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये व तेथून ते भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. ते पहिल्यांदा १९७३ मध्ये शिवसेनेतर्फे नगरसेवक निवडले गेले. नंतर ते मुंबईचे महापौर बनले. शिवसेनेतून नाराज होऊन ते काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर ते भ्रष्ट्राचार प्रकरणात तुरूंगातही गेले होते.

प्रफुल्ल पटेल: शरद पवार यांचे खास विश्वासू असलेले पटेल व्यापार जगतातही बरेच यशस्वी ठरलेले आहेत. सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत. ते क्रीडा फेडरेशनशीही संबंधित होते. ते युपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही होते.