आयपीएलबाबत अनिल कुंबळे आशावादी

नवी दिल्ली,
कोरोना साथीच्या पृष्ठभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असली, तरी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन नक्कीच करता येऊ शकते, असा आशावाद भारताचा माजी फिरकीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेने व्यक्त केला.

निश्चितच यंदाच्या वर्षांत ‘आयपीएल’चे आयोजन होण्याबाबत मी अद्यापही आशावादी आहे. विश्वचषक पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तसे न झाल्यास विश्वचषकापूर्वीच्या काळातील मालिकांऐवजी ‘आयपीएल’आयोजन खेळवावी, असे कुंबळे म्हणाला. तसेच आयपीएल झाल्यास प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणे अशक्य आहे. मात्र घरबसल्या चाहते नक्कीच सामने बघतील आणि त्याद्वारे आर्थिक नुकसानाची भरपाई करता येणे शक्य आहे, असेही कुंबळेने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *