जीवनातील प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि कष्ट करिअरला मार्ग दाखवणारे ठरते- प्रा. दासू वैद्य 

छत्रपती संभाजीनगर ,२२  एप्रिल / प्रतिनिधी :-युवकांनी आणि कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याची दिशा महाविद्यालयीन जीवनात ठरते. त्यासाठी मनातील निश्चित संकल्प इतरांना न सांगता उद्धिष्ट निश्चित करा. आपल्या अंगभूत कलागुण आणि इच्छाशक्तीच्या बळावर हळुवारपणे मार्गक्रमण करताना कधी अपयश आले, तर खचून जाऊ नका, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध कवी प्रा. दासू वैद्य यांनी तरुणाईला दिला. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव ‘स्पंदन-२०२३’ (नाट्यकला)उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे होते. 
             कवी प्रा. दासू वैद्य यांनी पारंपरिक शैलीत भाषण करण्यापेक्षा थेट युवकांशी संवाद साधला. त्यांचा संघर्षमय प्रवास, सामाजिक उपक्रम, मराठी नाट्यसृष्टीतील अनुभव आणि प्रवासातील आठवणींमुळे त्यांचा संवाद उत्तरोत्तर रंगतदार झाला. मी मराठवाड्यातील असल्यामुळे खडतर प्रवासातून मी हे यश मिळवीले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी यशाकडे मार्गक्रमण करताना हळुवार करा, म्हणजे धोका कमी असतो. जीवनातील प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि कष्ट करिअरला मार्ग दाखवणारे ठरते. आयुष्यात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असे काहीच नसते. आई आणि वृक्ष दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक जन्म देते आणि दुसरे श्वास. या दोन्ही गोष्टींची उतराई कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. असे  प्रा. दासू वैद्य यांनी सांगितले.     

          

‘स्पंदन २०२३’  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अधिपत्याखाली होत असून कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या संकल्पनेतून होत आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे डॉ. मिलिंद निकुंभ (प्रति कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), डॉ. सुनील फुगारे ( उप-कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तथा समन्वयक, स्पंदन २०२३), डॉ. मनोजकुमार मोरे (संचालक, विदयार्थी कल्याण विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) व डॉ. राहुल शिंदे (समन्वयक, स्पंदन २०२३, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) यांची प्रमुख उपस्थिती होती.

     महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव ‘स्पंदन-२०२३’ (नाट्यकला)छ्त्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, श्री. रणजीत मुळे, संस्थेचे सचिव श्री. पद्माकर मुळे व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. किशोर शिरसाट, सौ. स्मिता साबळे, प्रो. गजानन दांडगे, अँड. पदमनाथ पाठक, अँड. सुजाता पाठक,डॉ. योगिता तळेकर, श्री. दत्ता जाधव, डॉ. वैशाली बोधले, प्रो. नितीन गरुड, श्री. रवी कुलकर्णी, डॉ. अजय मगर, डॉ. रुपाली म्हस्के काम पाहत आहे.     
         यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. अमित वांगीकर, प्राचार्य डॉ. संदीप कांबळे, कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, आयुर्वेद महाविद्यालय शैक्षणिक प्रमुख डॉ. जयश्री देशमुख, मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील, विभागप्रमुख आणि महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, स्पर्धक, नाट्यरसिक आदी उपस्थित होते.